गेल्या आडीच वर्षात राज्यात आलेले उद्योग सामंजस करार झालेले असताना महायुती सरकारने गुजरातकडे वळवले – आमदार धीरज देशमुख

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – गेल्या आडीच वर्षात राज्यात आलेले उद्योग सामंजस करार झालेले असताना महायुती सरकारने गुजरातकडे वळवले आहेत असा आरोप आमदार धीरज देशमुख यांनी करून  या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नुसत्या घोषणा देवुन सर्व समाजाला फसवले आहे या उलट राज्यात अडीच वर्षापूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात अतिशय चांगलं काम केलं

लोकांना मोफत लस दिली जागतिक संघटनेने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले असे सांगून आपत्कालीन परिस्थितीत मंत्री आमदार अमित राजेश टोपे, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी राज्यातील लोकांना मदत केली दिवस रात्र फिरून लोकांना धीर दिला हे आपल्याला विसरता येणार नाही आताचे सरकारमधील लोक मात्र नुसत्या घोषणा देवुन वेळ मारून नेत आहेत याचाही आपण बारकाईने विचार करण्याची गरज आहे

असे आमदार धीरज देशमुख यांनी सांगून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार निवडून येणार आहे आपल्या मतदार संघात गावाची गरज ओळखून सर्व गावांना विकास कामांसाठी निधी दिला असून यापुढेही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस विजयी होईलच पण राज्याच्या मंत्रिमंडळात आपला वाढपी पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा

मतदार संघातून काँग्रेस महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले, यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख उपस्थित होते

Recent Posts