महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – महायुती धर्मापेक्षा जातीला महत्व देत मराठा आरक्षण आंदोलनातील आक्रमक आणि आभ्यासू असलेले शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी यांनी जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यावर टिका करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवक रवी सुडे यांचा घेतला
समाचार. लातूर जिल्ह्यातील भाजपाने आपले पिलावळ आवरावीत. आम्ही युतीचे मतदार आहोत. आम्ही कधीही कुणाच्या जातीवर किंवा कोणावरही बोललो नाही .जे आमच्या वाट्याला आल्यासच मी बोलतोय असा सज्जड दम (इशारा ) शिवसेनेचे लातूर जिल्हा युवा सेना प्रमुख कुलदीप सूर्यवंशी यांनी भाजपचे मा. नगरसेवक रवी सुडे
यांना दिला आहे. ही पिलावळ जर नाही आवरले एका ही भाजप नेत्याला कोणत्याही गावात आम्ही घुसू देणार नाही असा कडक इशारा दिला आहे , आता आमच्या सहनशितेच्या बाहेर जात आहेत तुम्ही. लोकसभेला माती करून घेतलात. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार
सर्वांना दिलेला आहे. एखादा समाज कोणती मागणी सरकारकडे करत असेल तर, तो त्यांचा अधिकार आहे. त्याला कोणी विरोध करायचा प्रश्नच उदभवत नाही. प्रवर्ग कोणाच्या बापाची जहागिरी नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत. खास करून भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटलांना ट्रोल करत
आहेत. यामुळे शिवसेनेचे आमचे नुकसान होत आहे. जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे कुठलाही नेता नसून,गरीब गरजवंत मराठे आणी अठरापगड जातीतील,धर्मातील बांधव आहेत. समजदार को इशारा काफी है ! अशी नाराजी आणि तीव्र निषेध युवा जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी यांनी माजी नगरसेवक रवी सुडे
यांना दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेपाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला या मेळाव्यावरून रवी सुडे यांनी “नारायण गडावरुन फतवा काढीतो ! महायुती उमेदवार कचाकचा पाडीतो !! – स्क्रीप्ट – जाणता काका ” अशी पोस्ट करत मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप आणि
बोचरी टिका केली होती याला प्रतिउत्तर देत लातूर जिल्हा शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख आणि मराठा आरक्षण चळवळीतील आक्रमक नेतृत्व कुलदीप सूर्यवंशी यांनी दिले आहे, पण याव घटनेवरून राज्यच्या राजकारणा प्रमाणे स्थानिक लेव्हलला पण महायुती मध्ये मतभेद दिसून येत आहेत.