महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील गंजगोलाई येथील श्री जय जगदंबा मातेची आरती करण्यात आली.यावेळी आमदार अमित देशमुख
यांनी उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार वैजनाथ शिंदे,लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंखे,विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे,श्री जय
जगदंबा माता गंजगोलाई मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवशंकरआप्पा बिडवे बसवंतआप्पा भरडे, एडवोकेट गंगाधरआप्पा हामने प्रा. मनमथ पंचाक्षरी शिवशंकरआप्पा
पारशेट्टी संजय हत्ते विजयकुमार चितकोटे एडवोकेट हृदयनाथ डांगे पंकज शेळके गिरीश ब्याळे रमेश सूर्यवंशी सूर्यकांत कातळे अबू मनियार विष्णुदास धायगुडे अभिजीत इगे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.