महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जागताप ) – शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्या भारतीय किसान युनियन (BKU) च्या मराठवाडा प्रभारी (अध्यक्ष) पदी लातूरचे सुपुत्र नेहरू (भाऊ) देशमुख यांची निवड झाली आहे. मोदी सरकारच्या शेतकरी काळे कायदे विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करून मोदी
सरकारला झुकवणारे राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्या भारतीय किसान युनियन (BKU) आता महाराष्ट्र (maharashtra) राज्यात सक्रीय होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघटन बांधणी भारतीय किसान युनियन महाराष्ट्र राज्य प्रभारी चंद्रशेखर (भाई ) पाटील करत आहेत. त्यात मराठवाड्याची जीमेम्मेदारी लातूरचे
नेहरू (भाऊ) देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. नेहरू (भाऊ) देशमुख यांनी मराठवाडा आणि लातूरच्या विशेष म्हणजे शेतकरी यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात, नेहरू (भाऊ) देशमुख यांचे लातूर सह (marathvada) मराठवाड्यात चांगला जनसंपर्क आहे. भारतीय किसान
युनियन चे (maharashtra) महाराष्ट्र राज्य प्रभारी (अध्यक्ष) चंद्रशेखर (भाई) पाटील भारतीय किसान युनियन चे महाराष्ट्र राज्य महासचिव सौ.रुपाली पाटील यांनी नेहरू (भाऊ) देशमुख यांना मराठवाडा प्रभारी (अध्यक्ष) पदाचे नियुक्ती पत्र दिले. राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियनचे मुख्य उद्देश आणि काम
सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून, शेतकऱ्यांच्या अडचणीत सोडवू आणि ( BKU) भारतीय किसान युनियनचे संघटन मराठवाड्यात जोमाने वाढवू असा विश्वास व्यक्त केला आणि भारतीय किसान युनियन चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) , राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंग, महाराष्ट्र राज्य प्रभारी चंद्रशेखर (भाई)पाटील, महाराष्ट्र राज्य महासचिव सौ.रुपाली पाटील यांचे आभार मानले.