महाराष्ट्र खाकी (अहमदपूर / विवेक जगताप ) – अहमदपूर – चाकूर मतदारसंघात नवा ट्विस्ट आमदार बाबासाहेब पाटील यांना धक्का देत माजी ZP सदस्य उद्योजक माधव जाधव लढवणार आमदारकी, अहमदपूर – चाकूर मतदारसंघातून आमदार बाबासाहेब पाटील यांना धक्का देत माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्योजक आणि
बाबासाहेब पाटील यांच्या जवळचे माधव जाधव यांनी विधानसभा निवडणुक लढवण्याचे केले जाहीर. माधव जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आमदारकी लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. माधव जाधव बोलताना म्हणाले की साध्यची राजकीय परिस्थिती पाहता मी हा निर्णय घेत आहे, सध्या राजकीय पक्ष फुटत आहेत,
परिवार फुटत आहेत सर्वजण स्वतःचा विचार करत आहेत, निवडणुक लढवून दुसऱ्याच पक्षात जात आहेत, या सर्व गोष्टीत मतदारसंघाचे प्रश्न लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे, या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी मी निवडणुक लढवणार आहे, सूर्य पश्चिमेला जरी उगवला तरी माधव जाधव निवडणुकीत उभा राहणार असे ठाम पने सांगितले,
शेतीशी निगडित व्यवसाय असल्यामुळे माधव जाधव यांचा सामान्य लोकांशी नाळ जुडलेली आहे, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला, नोकरदार यांच्या अडचणीची जन असणारे असे नेतृत्व आगामी निवडणुकीत उभा राहणार असल्यानेच अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील लोकांना अपेक्षित उमेदवार मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.