पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची सर्व वेवस्था करण्यासाठी NCP युवा नेते शुभम चितळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र खाकी ( अहमदनगर / विवेक जगताप  ) – पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची राहण्याची जेवणाची वेवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावे असे निवेदन अहमदनगरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया शहर प्रमुख शुभम चितळकर
यांनी केले आहे. नगर जिल्हा आणि शहराच्या

विकासासाठी आणि तरुणांनच्या हितासाठी शुभम चितळकर यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया शहर प्रमुख शुभम चितळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदनाच्या माध्यमातून पोलीस

भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या बाबतीत लक्ष वेधले आहे. शुभम चितळकर आपल्या निवेदनत म्हणता कि ” एकनाथजी शिंदे साहेब मी आपणास या पत्राद्वारे कळकळीची विनंती करत आहे, की बहुतांश भरती देणारे तरुण हे सामान्य व गरीब घरातील असून भरतीच्या कारणाने आता बाहेर घराबाहेर पडल्यामुळे

आणि आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांचे राहण्याचे व जेवण करण्याचे हाल होत आहेत, व बऱ्याच उमेदवारांनी आपले रात्र बस स्टॉप रेल्वे स्टेशन या ठिकाणी घालवली आहे, तसेच पावसाचे वातावरण असल्याने परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचे मनोबल देखील खच्ची होत आहे, आपण एक सामान्य कुटुंबातून आलेले नेतृत्व

आहात आपल्यालाही या गोष्टीची जाणीव आहे आपण सामान्यांचे नेते आहात, आपण यावर ठोस पावले उचलून यावरती प्रशासनाच्या पातळीवरती काहीतरी उपाय काढून त्यांची योग्य ती सोय करावी किंवा भरती पुढे ढकलावी” अशी मागणी करणारे शुभम चितळकर हे राज्यातील पहिले ठरले आहेत.

Recent Posts