महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला म्हूणन लातूर भाजपा शहर अध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात लातूर शहर भाजपाने आंदोलन केले पण आव्हाड यांच्या पेक्षा मोठा अवमान भाजपा अध्यक्ष देविदास काळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पाय ठेऊन
अवमान केला, मनुस्मृति दहन कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असणारे पोस्टर फाडण्याच्या घटनेचा राज्यात भाजपा निषेध करत आहे . लातूर शहरात भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष देविदास काळे यांच्या
नेतृत्वात लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला या निषेध आंदोलनाची पोस्ट आणी व्हिडिओ भाजयूमो चे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकला या व्हिडिओत आंदोलनाच्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार
घालताना अजित पाटील कव्हेकर आणी त्यांच्या बाजूला असलेले अध्यक्ष देविदास काळे, दिग्विजय काथवटे आणी बरेच पधादिकारी होते पुतळ्याला हार घालताना पुतळ्याच्या समोर पाय ठेऊन हार घातला असे व्हिडिओत दिसत होते पण गर्दी खूप असल्यामुळे तो पाय कोणाचा आहे हे कळत नव्हते अजित पाटील कव्हेकर किंवा
देविदास काळे या दोघांपैकी एकाचा पाय आहे असे दिसत होते पण आम्ही अजित पाटील कव्हेकर यांच्या स्विय सहाय्यक चंद्रशेखर पाटील यांच्याशी संपर्क करून विचारले तर ते म्हणाले तो पाय अजित पाटील यांचा नाही तो पाय (देवा भाऊ) देविदास काळे यांचा आहे. अशी चूक आमच्याकडून होऊ शकत नाही. पण हे आंदोलन भाजपा
अध्यक्ष देविदास काळे यांच्या अंगलट आल्याचे दिसत
आहे कारण जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला म्हणून आंदोलन केले पण स्वतःच भाजपा अध्यक्षानीं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पाय ठेऊन त्यांचा मोठा अवमान केला आहे, आव्हाड यांच्या कृत्यामुळे भाजपा राज्यभर
आंदोलन करत आहे देविदास काळे यांच्या कृत्याचा भाजपा निषेध करेल का ? आणी विरोधी पक्ष या बद्दल काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखे आहे