महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांना महाराष्ट्र काँग्रेसचे भविष्य म्हणून बघतात आणी अमित देशमुख यांच्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात भरारी मिळेल असे लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना वाटते. सध्या देशाच्या आणी राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची स्तिती म्हणावी
चांगली नाही, काही नेते काँग्रेस सोडण्याचा विचार करत आहेत अशा चर्चा आणी बातम्या समोर येत आहेत. या सर्व चर्चा मध्ये सोशल मीडियावर राजकीय विश्लेषक, समाजसेवक म्हणून चर्चेत असलेले प्रतीक पाटील यांनी राज्य काँग्रेस बद्दल एक प्रश्न उपस्तित केला होता. प्रतीक पाटील यांनी असे विचारले होते कि ” महाराष्ट्र काँग्रेसच्या
कोणत्या नेत्याला भविष्य म्हणून बघतात ज्या नेत्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात भरारी मिळेल? कमेंट करा या प्रश्नावर लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी “अमितजी विलासराव देशमुख “ अशी कमेंट करत महाराष्ट्र काँग्रेसचे भविष्य आणी अमित देशमुख यांच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला भरारी येईल असे
अमितजी विलासरावजी देशमुख. @AmitV_Deshmukh https://t.co/HIyA6bBKyE
— Vikrant Gojamgunde (@VikrantVikramG) February 11, 2024
म्हणले आहे. लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे एक तरुण आणी ऍक्टिव्ह राजकारणी आहेत. त्यांचा राजकारणातील आणी समाजकारणातील आभ्यास आणी अनुभव चांगला आहे. याचा अनुभव 2021 मध्ये लातूर महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व होते पण विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या कर्तृत्वाने आणी चातुर्याने
भाजपाची सत्ता एका रात्रीत आपल्या बाजूने करत लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करत सत्ता आणी महापौर पद मिळवले होते. या आधीही गोजमगुंडे यांच्या वक्तव्याना आणी मातांना विचारत आणी गंभीरतेने घेतले जाते, आता प्रतीक पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देतातना अमित देशमुख यांचे नाव घेतले आहे. आता पुढील काळच ठरवेल गोजमगुंडे यांनी म्हणलेले खरे होईल का खोट .