निवडणूक प्रक्रिया राबवितांना सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक- प्रभारी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जी. श्रीकांत

महाराष्ट्र खाकी ( छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी ) – निवडणूक प्रक्रिया राबवितांना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने सर्व प्रक्रियांसाठी नियमावली व सुचना दिल्या आहेत, त्यांचे काटेकोर पालन करावे व समन्वय राखून कामकाज करावे,असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा मनपा

आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आज जी. श्रीकांत यांनी निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यात मतदान यंत्रे व त्यांच्यासाठी राखावयाच्या सुरक्षा उपाययोजना याविषयी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी सादरीकरण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विधानसभा मतदारसंघनिहाय  पोलीस अधिकारी व निवडणूक कर्मचारी यांचा समन्वय राखला जावा. ज्या ठिकाणीमतदार यंत्रे ठेवलेली आहेत तेथील सुरक्षा उपाययोजनांची चाचणी करावी. तेथील पाहणी करावी. तसेच मतदारसंघनिहाय संवेदनशील मतदान केंद्र इ. ची नोंदणी करावी, असे निर्देश जी. श्रीकांत यांनी दिले. बैठकीस जिल्ह्यातील तहसिलदार, पोलीस दलातील अधिकारी आदी उपस्थित होते.

Recent Posts