महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्या स्वामी विवेकानंद विद्यालयातील समन्वयक तथा
प्राचार्य मारूती सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यातील चार सामाजिक संस्थांना एक लाख रूपयाच्या ग्रथांचे वाटप करून एक अनोखा व विधायक उपक्रम घेऊन या उपक्रमाने युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहर
जिल्हाध्यक्ष देविदास काळे, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, फायणांन्स डायरेक्टर बापूसाहेब गोरे, एमएनएस बँकेचे उपकार्यकारी संचालक किशनसिंह गहिरवार आदी मान्यवर उपस्थित होते.“वाचाल तर वाचाल”या उक्तीनुसार नागरिकांचे वाचन वाढावे, त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेमध्ये चांगली वाढ व्हावी.
या दृष्टीकोनातून स्वामी विवेकानंद विद्यालयातील समन्वयक प्राचार्य प्रा.मारूती सूर्यवंशी यांनी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून मातोश्री वृध्दाश्रम, सेवालय, खुशी फाऊंडेशन, आईचं घर या सामाजिक संस्थाना एक लाख रूपयाच्या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. या ग्रंथातून नागरिकांची वैचारिक
प्रगल्भता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी या कार्यक्रमास प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य संदिप पांचाळ, प्राचार्य शिरीन शॅमसन, डॉ.शैलेश कचरे, प्राचार्य लबडे, प्राचार्य बोंडगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल
गालीब शेख यांनी केले. या कार्यक्रमास जेएसपीएम संस्थेतील स्वामी विवेकानंद कॅम्पासमधील सर्व कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.