महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरात बनावट वाहन क्रमांक वापरुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकाला वाहतूक नियंत्रण शाखा, लातूरच्या पोलिसांनी शिताफिने लातूर शहरातून हरी श्रीरंग माळी ला (वय 51, रा. स्वराज्य नगर, पाखर सांगवी, लातूर.) बनावट क्रमांक वापरून प्रवासी वाहतूक करीत असलेल्या
ऑटोसह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात ताब्यात (अटक) घेतले आहे. लातूर वाहतूक नियंत्रण शाखेचा कारभार पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्याकडे आल्यापासून लातूर शहरातील वाहतुकीत कमालीचे बदल आणि वाहतुकीत सुधारणा दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक
गणेश कदम यांच्या नेतृत्वात मागील काळात अवैद्य वाहतूक, फटका सायलेन्सर, असे अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. अशीच एक कारवाई दि.18 ऑगस्ट रोजी शहरात वाहतूकीचे नियमन करीत असताना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना माहिती मिळाली की, लातूर शहरांमध्ये एक ऑटो चालक
त्याच्या ऑटोचा नंबर बदलून दुसऱ्या एका ऑटोचे नंबर लावून प्रवासी वाहतूक करीत असून एकाच क्रमांकाचे दोन ऑटो प्रवासी वाहतूक करीत आहेत.अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी ड्युटीवरील वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस अधिकारी व
अंमलदारांना वायरलेस द्वारे ऑटो बद्दल माहिती देऊन दोन्ही ऑटो ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या.वाहतूक पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत प्रवासी वाहतूक करीत असलेले एकाच क्रमांकाचे दोन ऑटो ताब्यात घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेत आणले. दोन्ही ऑटो चालकाकडे असलेल्या ऑटोच्या कागदपत्राची पाहणी केली असता
ऑटो चालक हरी श्रीरंग माळी हा त्याच्या ताब्यातील ऑटोचा क्रमांक MH 12 HQ 5385 असा असतानाही जाणीवपूर्वक MH 24 AT 2209 असे लिहून लातूर शहरात प्रवासी वाहतूक करता यावी व ई-चलनाचा दंड आला तरी तो दुसऱ्याच क्रमांकावर जाईल या हेतूने शासनाची व मूळ ऑटो चालकाची फसवणूक केल्याचे
निष्पन्न झाले. वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस अंमलदार रसूल सय्यद यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे हरी श्रीरंग माळी याचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/2023 कलम 420 भादवी तसेच 66 (1)/ 192 मोटार वाहन कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास
नारायण बनसोडे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी,(लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रतिभा ठाकूर, पोलीस अमलदार सुग्रीव नागरगोजे, मद्देवाड, घोगरे, बिराजदार, रसूल सय्यद यांनी केली आहे.