प्रसिद्ध श्‍वसन विकार तज्ञ् डॉ. रमेश भराटे यांची इंडियन चेस्ट सोसायटीच्या राष्ट्रीय गव्हर्रनिंग कौंन्सिल पदावर बिनविरोध निवड

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील महाराष्ट्राचे प्रसिद्ध श्‍वसनविकार तज्ञ तथा गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश भराटे यांची भारतीय श्‍वसन विकार संस्था म्हणजेच इंडियन चेस्ट सोसायटी या नामांकित संस्थेच्या वार्षिक बैठकीमध्ये राष्ट्रीय गव्हर्रनिंग कौंन्सिलवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. डॉ.

रमेश भराटे श्‍वसनविकार या विषयामध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लातूर,नांदेड,बीड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर परिसरातील रुग्णांना सेवा देत आहेत. डॉ. रमेश भराटे (IMA) आयएमए महाराष्ट्रचे विद्यमान उपाध्यक्ष असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात राज्य पातळीवर पण आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या

आधी डॉ. रमेश भराटे (IMA) आयएमए लातूर अध्यक्ष असताना त्यांनी उत्तम कार्य केले आहे. डॉ. रमेश भराटे सामाजिक कार्यात सक्रीय असतात. इंडियन चेस्ट सोसायटी ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकीत संस्था असून ही संस्था केंद्र सरकार व राज्य सरकारांना वेळोवेळी श्‍वसनविकार व छाती विकारावर

नवनवीन संशोधन व मार्गदर्शन करीत असते. अशा प्रतिष्ठीत संस्थेवर डॉ. भराटे यांची निवड झाल्यामुळे लातूच्या वैद्यकीय क्षेत्राचा बहुमान वाढला आहे. या निवडीबद्दल (IMA) आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे, सचिव डॉ. संतोष कदम, डॉ. रवा वानखेडकर, डॉ. लेले, डॉ. ऊत्तुरे, डॉ. अशोक आढाव तसेच लातूर

(IMA) आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. भराटे यांचे
अभिनंदन केले, आणि डॉ. रमेश भराटे यांचे या निवडीबद्दल विवीध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे