महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) नव निर्वाचित अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी तर जेनेेरिक औषधांच्या गुनवत्तेवरच प्रश्न उपस्तित केला आहे. ते लातूर येथे दिवंगत लोकनेते विलासराव देशमृख यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजन केलेल्या कार्यक्रमाच्या
पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. डॉक्टरांनी रुग्णांना जेनेेरिक औषधे लिहून देणे आवश्यक आहे. तसे न करणाऱ्या डॉक्टरांना दंड आकारण्यात येईल, तसेच प्रॅक्टिस करण्याचा त्यांचा परवाना काही काळ स्थगित करण्याचीही कारवाई होऊ शकते, असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ( NMC ) जारी
केलेल्या नव्या नियमांत म्हटले आहे. डॉक्टरांनी ब्रँडेड जेनेरिक औषधे रुग्णांना लिहून देणे टाळावे. असे आदेश असताना एखाद्या प्रतिष्टीत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा कडून जेनेेरिक औषधाच्या गुणवत्तेबद्दल असे विधान करणे खूप गंभीर बाब आहे.
भारतामध्ये आरोग्यसेवेवर होणाऱ्या एकूण खर्चात
औषधोपचारांवरील खर्चाचे मोठे प्रमाण आहे. ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे 30 ते 40 टक्क्यांनी स्वस्त असतात. त्यामुळे डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून दिल्यास आरोग्यसेवेवरील खर्चात कपात होऊ शकते. ब्रँडेड औषधांपेक्षा ब्रँडेड जेनेरिक औषधे स्वस्त असतात. मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणाऱ्या जेनेरिक
औषधांची किंमत ही ब्रँडेड जेनेरिक औषधांपेक्षा कमी असते. पण डॉ. अनिल राठी यांच्या विधाणामुळे सरकारच्या विशेषतः राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ( NMC ) आदेशाला केराची टोपली म्हणावे का ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या ( NMC ) आदेशाला लातूर ( IMA ) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अनिल राठी असे म्हणत असतील तर जेनेरिक औषध कोणताच डॉक्टर रुग्णांना लिहून देणार नाही! राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ( NMC ) डॉ. अनिल राठी यांच्या विधानाची दाखल घेईल का ?