मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवा ;धनंजय मुंडेंची मागणी

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी यादृष्टीने यंदाचा अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित करण्यात

येणाऱ्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना निमंत्रित करावे अशी विनंती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी विधानसभा सभागृहात मांडला होता; त्याचे समर्थन करण्यासाठी धनंजय मुंडे बोलत होते. दरम्यान मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मंत्रिमंडळाची एक बैठक छत्रपती संभाजी नगरला घ्यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. निजामाच्या राजवटीत झालेले अत्याचार व त्याविरुद्ध मराठवाड्याने

दिलेला निकराचा लढा यामध्ये मराठवाड्यातील संत परंपरा, लढाऊ वृत्ती, ज्ञान, संस्कृती यांनी झालेली पायाभरणी, त्याचबरोबर मराठवाड्याला सुरुवातीपासून असलेला संघर्षाचा वारसा याचीही आठवण करून देत धनंजय मुंडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व केलेले स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू,

भाऊसाहेब वैशंपायन, राविणारायन रेड्डी, बाबासाहेब परांजपे आदी हुतात्म्यांचे स्मरण केले. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटचालीतील योगदान दिलेल्या स्वर्गीय शंकरराव चव्हाण, स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आदी सर्वांचेच संस्मरण करत धनंजय मुंडे यांनी त्यांनाही अभिवादन केले.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे