महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आज रविवारी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर येथील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे व शहर जिल्हाध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी पक्षाचे पदाधिकारी व
कार्यकर्त्यांसह अभिवादन केले. दिवंगत राजीव गांधी यांनी 1984 मध्ये त्यांची आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा वयाच्या 40 व्या वर्षी ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. त्यांनी 2 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे पंतप्रधान
म्हणून काम केले. 20 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली.