दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रिझर्व्ह बँक व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपुर्वक अभिनंदन – प्रेरणा होनराव भाजपा राज्य प्रवक्त्या

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI ) मोठा निर्णय घेत दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे निर्देश दिले. यानंतर या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. या

पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप च्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RBI चे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले आहे. प्रेरणा होनराव आपल्या पोस्ट मध्ये लिहितात की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. बँकांनी 2000 रुपयांच्या नोटांचे वितरण करू नये असे आदेश

देण्यात आले आहेत. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत कायदेशीरित्या वैध राहतील. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने नागरिकांना मुदत दिली आहे त्यामुळे आता नागरिकांची कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. हा

निर्णय घेतल्याबद्दल रिझर्व्ह बँक व पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे मनःपुर्वक अभिनंदन..! प्रतिक्रिया दिली आहे.

Recent Posts