महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – उद्या दि.10 मे वार बुधवार रोजी सायंकाळी 6.11 वा. उटगे मैदान, औसा येथे संपन्न होणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाच्या शुभविवाहाचे तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे सर्वांना सस्नेह आग्रहाचे निमंत्रण आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्वांना दिले आहे .मंडपात बसण्याची व्यवस्था कशी
असेल या संदर्भात सविस्तर माहीती दिली आहे. मंडपात बसण्याची व्यवस्था डाव्या बाजूला स्टेज समोर मा खासदार, मा आमदार, माजी खासदार, माजी आमदार, आयएएस आयपीएस यांची आणि त्याच्या पाठीमागे पुरुषांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तर उजव्या बाजूला स्टेज समोर पवार -मोहीते पाटील
कुटुंबांसह सर्व वधु-वरांचे नातेवाईक, इतर शासकीय अधिकारी, प्रोफेशनल्स व पत्रकार यांची आणि त्याच्या पाठीमागे महिलांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सामूहिक विवाह मंडपात प्रवेश व्यवस्था अशी असेल
गेट क्र 1 : सर्व निमंत्रित, गेट क्र 2: मा. खासदार, मा. आमदार, माजी खासदार, माजी आमदार, आयएएस, आयपीएस व धर्मगुरू, गेट क्र 3: विशेष निमंत्रित, पवार व मोहिते पाटील कुटुंबांचे निकटवर्तीय, सर्व वधु-वरांचे नातेवाईक, सर्वपक्षीय पदाधिकारी, विधीज्ञ, डॉक्टर्स, प्रोफेशनल्स, शासकीय अधिकारी व पत्रकार
भोजन व्यवस्था
स्टेजच्या पाठीमागे डाव्या बाजूला महिलांची तर उजव्या बाजूला पुरुषांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाची वेळ दुपारी 1 ते 5.30 पर्यंत आणि लग्नानंतर रात्री 11.30 वाजे पर्यंत असेल.
पार्किंग व्यवस्था
उंबडगा रोडवर 4 ठिकाणी, जुने बसस्थानक परिसरात व बसस्थानकाच्या पाठीमागे, उमरगा – लातूर रोडवर केदारनाथ पेट्रोल पंपाशेजारी आणि किल्ला परिसरात ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून सर्वांनी गाड्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क कराव्यात. कोणीही रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करु नयेत असे
आवाहन आयोजक समिती आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे. उपरोक्त व्यवस्थेची रचना आपल्या सोयीसाठीच करण्यात आली असून त्याचे पालन करुन तसेच ट्राफिक व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, संरक्षण यंत्रणा व स्वयंसेवक यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती. या सगळ्याच्या पाठीमागे आपली कसलीही गैरसोय होऊ नये इतकाच हेतू आहे.