महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप) – राज्यातील (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी MPSC परीक्षार्थी आज पुणे येथील अलका चौकात पुन्हा आंदोलन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काल
रात्री उशिरा फोनवर आंदोलनाची माहीती दिली. परीक्षा पद्धतीत इतका मोठा बदल करताना परीक्षार्थींना जितका वेळ मिळायला हवा होता तितका मिळाला नाही, अभ्यास सोडून त्यांना वारंवार आंदोलन करावे लागत असून यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आग्रही विनंती पुनश्च एकदा आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. काही ठोस
आश्वासन मिळालं नसलं तरी एकंदरीतझालेल्या चर्चेवरुन सरकार सकारात्मक असल्याचे जाणवले. आज अलका चौक पुणे येथे होणार्या आंदोलनास औसा मतदार संघाचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अभिमन्यू आणि आमदार गोपीचंद पडळकर भेट देणार आहेत असे अभिमन्यू पवार यांनी ट्विट करून सांगितले आहे. आंदोलन करते MPSC परीक्षार्थी प्रतिनिधींचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करुन देण्याचा प्रयत्न करणार आहेत. असे आपल्या ट्विमध्ये म्हणाले आहेत.