महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर SP सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर LCB चे कार्य सुपरफास्ट सुरु आहे असे सध्या चित्र आहे. आणि SP सोमय मुंडे आणि LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील नागरिक समाधान वेक्त करत आहेत. SP सोमय मुंडे यांच्या निर्देशाने LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या
मार्गदर्शनात शिवाजीनगर आणि MIDC पोलीस स्टेशन येथील एक – एक गाडी चोरीचे आणि मंदिरातील दानपेटी चोरणारऱ्या आरोपीस मुद्देमालसाह पकडण्यात आले आहे. दि. 22 जानेवारी ( LCB) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील वाहन जुपिटर कंपनीची स्कूटर घेऊन
संशयित आरोपी गणेश साळुंके हा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने LCB पथक तात्काळ त्या ठिकाणी पोचून रोडवर ज्युपिटर स्कूटरसह थांबलेल्या गणेश साळुंके ला विश्वासात घेऊन विचारपूस करून त्याच्या ताब्यात असलेल्या वाहन व एका लोखंडी दानपेटी संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, ज्युपिटर
स्कूटर काही दिवसापूर्वी लातूर पंचायत समितीच्या पाठीमागून चोरी केलेली आहे. तसेच सदरची दानपेटी दोन दिवसांपूर्वी विशाल नगर येथील काशी विश्वेश्वर मंदिरातून तो आणि त्याचे अन्य दोन साथीदार अशा तिघांनी मिळून ज्युपिटर स्कूटर दानपेटी चोरी केलेली असल्याचे कबूल केले.आरोपी गणेश साळुंखे याने चोरलेल्या ज्युपिटर स्कूटर व दानपेटी संदर्भात लातूर शहरातील शिवाजीनगर व
MIDC पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत, पुढील कायदेशीर कार्यवाही करिता गुन्ह्यातील आरोपी गणेश साळुंखे यास पुढील कार्यवाहीसाठी जप्त मुद्देमालसह शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर दोन आरोपीचा शोध सुरू आहे. आणखी एका गाडी चोरास ठोकल्या बेड्या मोतीलाल उर्फ कुक्या बादल शिंदे, वय 22 वर्ष, राहणार मोहा, तालुका कळंब
जिल्हा उस्मानाबाद. याच्या कडून होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल जप्त करण्यात आली असून त्याच्यावर कलम 124 मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शिताफीने गोपनीय माहितीचे संकलन करून तात्काळ कारवाई करत लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून
चोरी केलेल्या मोटारसायकल व दानपेटीचोरी चा गुन्हा उघडकीस आणून नमूद आरोपींता कडून दोन मोटरसायकल व एक दानपेटी, मोबाईल असा एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत
आहेत. हि कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या निर्देशात ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात पोलिस अमलदार राजेन्द्र टेकाळे, प्रकाश भोसले, नवनाथ हाजबे, तूराब पठाण,योगेश गायकवाड, रामहारी भोसले, मोहन सुरवसे, प्रदिप चोपणे यांनी केली आहे.