Latur police लातूर SP सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात LCB पथकाच्या गुटखा आणि अवैध दारू आड्यावर कारवाया

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात गुटखा विक्रीचे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे असे चित्र जिल्ह्यात दिसून येत होते आणि जिल्ह्यात तशी चर्चा होती, ही बाब लक्षात घेऊन लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशनुसार लातूर LCB पोलीस निरीक्षक गजानन

भातलावंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) पोलीस अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. या मोहिमे अंतर्गत लातूर LCB पोलीस पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून विराट नगर ,खाडगाव रोड परिसरात प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी  विक्री

व्यवसाय होत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने माहितीची शहनिशा करून  स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने या ठिकाणी छापा मारून एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांच्या कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले  गुटका व सुगंधित पानमसाला व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात

येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 18 लाख 33 हजार 550 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे. पोलीस अमलदार अंगद कोतवाड यांचे तक्रारीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा फिरोज उर्फ आदम आयुब उमाटे वय 30 वर्ष, राहणार विराट

नगर, खाडगाव रोड, लातूर. याच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन  येथे  गुन्हा रजिस्टर क्रमांक 779/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59 याप्रमाणे गुन्हा दाखल करून 18 लाख 54 हजार 250 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास MIDC

पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत. या गुटख्या विरुद्ध कारवाई करत त असतानाच LCB पथकाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये  सापळा लावून अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या राहुल लक्ष्मण कांबळे, वय 29, राहणार लोहारा, तालुका उदगीर याला देशी दारूची अवैध वाहतूक करण्यात येत असलेली कारसह ताब्यात घेऊन त्यामधील 53 हजार रुपये किमतीचे 16 बॉक्स देशी

दारू कारसह जप्त करून रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करिता उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे ,राजेश कंचे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, सचिन मुंडे, बालाजी जाधव, रवी कानगुले यांनी पार पाडली.

Recent Posts