महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – वसईतील श्रद्धा वालकर तरुणीच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे. तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. हे तुकडे दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकून दिले. या घटनेने पूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. याच घटनेच्या
निषेधार्थ प्रेरणा होनराव यांच्या पुढाकारातून समस्त लातूरकरांचा भव्य हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लातूरकर प्रचंड प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले होते . लातूर येथील गंजगोलाई येथील आई जगदंबा मंदिर येथून सुरू झालेला हा मोर्चा जगदंबा मातेचे स्मरण करून सुरू करण्यात आला. गंजगोलाईला प्रदक्षिणा मारून हा मोर्चा हनुमान चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज
चौकामध्ये संपला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व लोकांनी सदैव धर्म रक्षण व धर्मनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा घेतली. सोबतच सर्वधर्मसमभाव म्हणत असताना धर्मावर संकट जर येत असेल तर त्याचा प्रतिकार देखील आम्ही तितक्याच ताकदीने करू, तसेच लव्ह जिहाद सारख्या विषयांमध्ये बळी पडलेली आमची माता, भगिनी कधीही घरी येण्याची इच्छा तिला झाल्यास तिला वापस घेऊन
आम्ही तिचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी प्रतिज्ञा यावेळी घेतली. या मोर्चादरम्यान सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवून मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गांधी चौक, अशोक हॉटेल या भागामध्ये व्यापारी वर्गाच्या वतीने मोर्चातील लोकांसाठी पाण्याचे वाटप करण्यात आले. मोर्चाची सांगता प्रत्यक्ष श्रद्धा अभिनयातून बोलते आणि तिचे व्यथा मांडते आहे अशा
माध्यमातून करण्यात आली. तसेच श्रद्धाच्या वडिलांच्या मनातील व्यक्त झालेल्या भावना लोकांसमोर प्रस्तुत करण्यात आल्या. मोर्चाच्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या त्या म्हणजे लव्ह जिहाद विरुद्ध कायदा झालाच पाहिजे आणि धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे. तसेच अनेक घोषणा मोर्चाच्या दरम्यान देण्यात आल्या. या मोर्चाची प्रमुख मागणी लोकांनी मोर्चात सहभागी होऊन
प्रकर्षाने सरकारच्या व जनतेच्या समोर मांडली. तसेच
एकता मे जान है! हिंदू देश की शान है, श्रीरामाचे आम्ही हनुमान भारतीय स्त्री आमचा अभिमान, धर्मांतरण विरोधी कायदा झालाच पाहिजे, प्रणाम आमचा आईला माता मानतो गाईला, जपूया आपली नाजूक कळी नाही जाऊ देणार लव जिहाद ची बळी आणि श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे अशा मागण्यांचे फलक घेऊन लातूरकर मोर्चा सहभागी झाले होते.