महाराष्ट्र खाकी ( नाशिक / विवेक जगताप ) – सरकार देशातील गरीब जनतेसाठी मोफत आणि अल्प दरात गहू, तांदूळ आणि इतर धान्य रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटप करते पण या गरिबांच्या धाण्यावर काही व्यापारी डल्ला मारत आहेत असे अनेक प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. रेशन धाण्याचा काळा बाजार करणारे असे व्यापारी राज्यात आणि देशात प्रत्येक जिल्ह्यात,
तालुक्यातील आणि गावात आहेत. अशा व्यापाऱ्यावर पोलीस आणि पुरवठा विभागाची कारवाई होत असते पण ती नावा पुरतीच, अशीच एक कारवाई नाशिक जिल्ह्यातील कळवण पोलिसांनी केली आहे. कळवण देवळा रोडवर प्रभात स्टीलचे बाजुला असलेल्या गोडावुन मध्ये शासनाने रेशनवर उपलब्ध करून दिलेल्या तांदळाचा साठा खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवला
असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने जोगेश्वरी या गोडावूनवर छापा टाकून अजय मधुकर मालपुरे, (52) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शासनाने गोरगरीब जनतेस अल्पदरात उपलब्ध करून दिलेले सुमारे 19.40 टन तांदुळ किंमत रुपये – 5 लाख 82 हजार तर 15.20 टन गहू,3 लाख 80 हजार रुपये, घटनास्थळावर मिळालेली संशयीत वाहने असा 24 लाख 62 हजार
रूपयाचा मुददेमाल खुल्याबाजारात विक्री व वाहतूक करण्याचे उद्देशाने साठा करतांना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस कळवण न्यायालयात उभे केले असता जामीनावर मुक्तता करण्यात आली. सदर गुन्हयाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचे पथक करीत आहे.