महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्यातील भाजपाचे युवा नेते अजित पाटील कव्हेकर हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण, सहकार याची जोड घालून सर्वप्रथम प्रभागामध्ये कामे केली. अजित पाटील कव्हेकरांनी केलेल्या विकास कामातून प्रभाग 18 आदर्श वार्ड म्हणून नावारूपास आणण्याचे काम त्यांनीच केलेले
आहे. तसेच भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचे कामही अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अप्पाराव कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अप्पाराव कुलकर्णी रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात सकाळ समुहातर्फे सकाळ आयडॉल पुरस्कार युवा नेते अजित पाटील
कव्हेकर यांना प्रदान करण्यात आला होता त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अप्पाराव कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा.मारूती सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. रमकांत घाडगे, उपप्राचार्य डॉ. पी. आर शिंदे, उपप्राचार्य गणेश नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे
बोलताना कुलकर्णी म्हणाले की, युवा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी आपल्या कार्यातून भाजपा युवा मोर्च्याच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देण्याचे काम केले. तसेच शहरातील अनेक प्रश्नांबाबत आंदोलन करून शहरातील सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचे काम केले. यापुढील कालावधीतही जनतेच्या हिताची कामे करून सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत अजितभैय्या बनतील
अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.मारूती सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा. डॉ. चंद्रकांत शेरखाने यांनी मानले. सध्याच्या राजकारणात अशा सक्रीय युवकांची गरज असून त्यांच्या हातून आदर्श पिढी घडणार आहे. सकाळ समुहाच्या माध्यमातून सकाळ आयडॉल पुरस्कारासाठी योग्य नेतृत्वाची निवड केलेली
असल्यामुळे या पुरस्कारामुळे युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांची राजकीय ऊंची वाढणार आहे. त्याबरोबरच पुरस्कारामुळे समाजाप्रती असलेली जबाबदारीही वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी यापुढील काळातही सदैव
जनसेवेसाठी तयार रहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अप्पाराव कुलकर्णी यांनी केले.