महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – मराठवाड्यात निजामाची जुलमी राजवट संपुष्टात येऊन येणाऱ्या 17 सप्टेंबर 2023 ला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे भारतापेक्षा एक वर्ष, एक महिना उशीरा स्वतंत्र मिळालेल्या मराठवाड्याच्या पदरी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दुसऱ्या वेळेस साजरा करण्याचा योग मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने येत आहे. त्यानिमित्त मराठवाडा
मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष पदी लातूरचे माजी खा. डॉ. सुनील गायकवाड तर कार्यवाहक पदी सिध्देश्वर माने यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव हा योग साधून हा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. मराठवाडा महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
यामध्ये लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे . अमृत महोत्सवी वर्षेभर संपूर्ण मराठवाडयात वाड्या वस्ती गाव शहरात 75 ठिकाणी व्याख्यान व परिसंवादा सोबतच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात हैदराबाद संस्थानातील भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्थिती आणि क्रांतिकारी चळवळ
यावर परिसंवाद आणि व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील त्याग अन शौर्याची भावी पिढ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे . सदरील समारोह समिती स्वप्निल देशमुख ( कोषाध्यक्ष ) त प्रा सोमनाथ लांडगे ( उपाध्यक्ष ) म्हणून कार्यरत असतील असे या मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समितीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.