Latur earthquake लातूर जिल्ह्यातील हासोरी परिसरात 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 1993 ला झालेला भयानक भूकंपाच्या आठवणी लातूरकरच काय पण महाराष्ट्र विसरला नाही. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी गावाच्या परिसरात मागील काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात जमिनीतून आवाज येत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक घाबरले आहेत. या भागात भुकंपाचे

धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. प्रशासनाने मात्र भुकंप नाही, केवळ जमिनीतून आवाज येत आहेत असे सांगितले होते. पण जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी पत्रकार परिषद घेऊन हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची दिली. शुक्रवारी पहाटे 3.38 मिनिटांनी 2

रिश्टर स्केलचा भुकंप झाला असून त्याची नोंद भुकंप मापक वेधशाळेने घेतली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेपासून 52 किलोमीटर अंतरावर हासोरी परिसरात यांचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली 5 किलोमीटर अंतरावर तो असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राष्ट्रीय भुकंप केंद्र पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे शास्त्रज्ञ राजीव कुमार, अजयकुमार शर्मा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील भुगर्भशास्त्र संकुलाचे प्रमुख प्रा. डॉ. अविनाश कदम, प्रा.डॉ. अर्जन भोसले हे उपस्थित होते.

 

Recent Posts