प्रसिद्ध श्वसनविकार तज्ञ डॉ.रमेश भराटे यांची IMA महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी बहुमताने निवड

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरसह राज्यात श्वसनविकार तज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले लातूर शहरातील गायत्री हॉस्पिटल चे संचालक डॉ रमेश भराटे यांची इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात ‘IMA’ या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या देशव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली असून लातूरला हा बहुमान पहिल्यांदाच प्राप्त झाला

आहे. वैद्यकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात डॉ.रमेश भराटे यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. डॉ.रमेश भराटे यांनी यापुर्वी लातूरच्या ‘IMA’चे अध्यक्ष, सचिव शिवाय संघटनेच्या राज्यांच्या विविध पदावर उल्लेखनीय कार्य केलेआहे. या संघटनेच्या विविध पदाधिका-यांच्या निवडी नेहमीप्रमाणे बिनविरोध होतात.परंतू बिनविरोध निवड करण्याची संघटनेची परंपरा यावेळी पहिल्यांदा खंडीत

झाली. यावेळी अत्यंत चुरशीच्या लढाईत राज्यातील समस्त डॅाक्टरांनी प्रत्यक्ष मतदानाद्वारे लातूरचे डॉ.रमेश भराटे यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली असून अमरावतीचे डॉ. दिनेश ठाकरे यांची राज्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 35 हजार डॅाक्टर हे ‘IMA’ या देशव्यापी संघटनेचे सदस्य असुन पदाधिका-यांच्या निवडी या प्रत्यक्ष मतदानाद्वारे

केल्या जातात. डॉ. रमेश भराटे यांच्या रुपाने संघटनेच्या इतिहासात लातूरला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाल्याने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आ.अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ.धिरज देशमुख यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुक होत आहे.

Recent Posts