महाराष्ट्र खाकी ( औरंगाबाद ) – भारत सरकारचे केंद्रीय कायदामंत्री किरेन रिज्जु यांची लातूरचे माजी खासदार संसद रत्न डॉ. सुनील गायकवाड, विश्व दलित परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी भेट घेऊन अनेक सामाजिक विषयावर चर्चा केली. औरंगाबाद येथे केंद्रीय कायदामंत्री किरेण रिज्जू जी यांची भेट घेऊन विश्व दलित परिषद करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती
विस्तृतपणे माननीय मंत्री महोदय यांना दिली. विशेषता विश्व दलित परिषदेच्या वतीने केंद्रीय कायदामंत्री यांना विनंती केली की जे लोकप्रतिनिधी अनुसूचित जाती जमातीचे नसतानाही त्या जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून खासदार, आमदार झालेले आहेत असे अनेक उदाहरण भारतामध्ये आहेत. जसे जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती यांची जात प्रमाणपत्र खोटे ठरले
तर त्यांचा सदस्यत्व रद्द होतं.परंतु खासदार, आमदार यांचे जातीचे प्रमाणपत्र कोर्टाने रद्द केल्यानंतर सुद्धा ते खासदार, आमदार ,राहतात अशा लोकप्रतिनिधींच्या विरोधात नकली जात प्रमाणपत्र घेऊन जे मागास असल्याचा फायदा घेतात अशा खासदार, आमदार लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करावे आणि अनुसूचित जातीच्या, जमातीच्या अधिकारावर गडांतर आणले म्हणून
अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करून जेलमध्ये टाकले जावे.अशा संदर्भातील कायदा हा भारत सरकारने लवकरात लवकर बनवावा आणि तो अमलात आणावा अशी मागणी माननीय मंत्री महोदयाकडे विश्व दलित परिषद च्या वतीने केली. त्या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी दिल्लीला शिस्त मंडळ ला येण्यासाठी निमंत्रण दिले. सामाजिक आणि धार्मिक विषयावर चर्चा करून
माननीय मंत्री महोदय यांना शाल आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी विश्व दलित परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट वारे विश्व दलित परिषदेचे विधी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट क्षीरसागर दैनिक लोकशासनचे उपसंपादक सारंग वाघमारे आदी उपस्थित होते.