महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहर महानगरपालीका काँग्रेस च्या ताब्यात आल्यापासून आणि विशेषता महापौर विक्रांत गोजमगुंडे झाल्यापासून ते आत्ता पर्यंत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरातील प्रत्येक घटकाचा विकास कसा होईल आणि मनपाची प्रत्येक सुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे कशी पोहचेल या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले आहे आणि देत आहेत. राज्य शासनाच्या
आणि केंद्र शासनाच्या लोकउपयोगी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. शासनाच्या अशाच एका योजनेद्वारे लातूर शहरातील 6 महिला बचत गटांना दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत प्रत्येकी 4 लक्ष कर्ज महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार , विरोधी पक्ष नेते दीपक सुळ, शहर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत तोडकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
स्वामी समर्थ महिला बचत गट वाल्मिकी नगर, श्री समर्थ महिला बचत गट वाल्मीकि नगर, जय मल्हार महिला बचत गट इंडिया नगर, नालंदा महिला बचत गट, लेबर कॉलनी, नवभारत महिला बचत गट सम्राट चौक, सरस्वती महिला बचत गट तुळजापुरे नगर प्रत्येकी 4 लक्ष रुपये वाटप करण्यात आले. या निधीचा वापर करून ते दर्जेदार उत्पादने बाजारात विक्रीस आणतील आणि त्यातून खऱ्या अर्थाने महिला #स्वावलंबी होतील असा विश्वास आहे.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार , विरोधी पक्ष नेते दीपक सुळ, शहर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत तोडकर, नितीन सुरवसे, लक्ष्मणजी जाधव, समुदाय संघटक विरेंद्रजी सातपुते तसेच वाल्मिकी वस्ती स्तर संघ, गिरवलकर नगर, इंडिया वस्ती सर संघ इंडिया नगर, नवनिर्माण वस्ती संघ सम्राट चौक, समता वस्ती सर संघ तुळजापुरे नगर याचबरोबर शहर स्तर संघाचे पदाधिकारी व या बचत गटाचे सर्व महिला सदस्य उपस्थित होते.