महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देणारया विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण उद्या रविवार दिनांक 15 मे रोजी विरार येथील विवा कॉलेज येथे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रकाश जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.. एस.एम.देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना यावेळी जीवनगौरव
पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील मान्यवर पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते..कोरोना परिस्थितीमुळे गेली तीन वर्षे हा कार्यक्रम झाला नव्हता.. यावर्षी
पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.. पंढरीनाथ सावंत गेली अर्धे दषक पत्रकारितेत कार्यरत असून पत्रकारितेतील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचा महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केलेला आहे.. त्यांनी दीर्घकाळ मार्मिकचे संपादक पद देखील भूषविलेले आहे.. मी पंढरी गिरणगावचा आत्मचरित्राबरोबरच त्यांनी
विविध पुस्तकांचे लेखन केलेले आहे.. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यापुर्वी हा पुरस्कार दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य यांना देण्यात आला होता. पंढरीनाथ सावंत यांच्या खेरीज आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्काराने निलेश खरे यांना, सावित्रीबाई फुले पुरस्काराने मृणालिनी नानिवडेकर यांना, रावसाहेब गोगटे पुरस्काराने अच्युत
पाटील(पालघर) यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्काराने भारत रांजणकर,(अलिबाग) प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार दीपक
प्रभावळकर(सातारा) , भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्काराने राजेंद्र काळे (बुलढाणा) यांना आणि नागोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्काराने उत्तम दगडू (वसमत) दीपक कैतके (मुंबई) यांना सन्मानित करण्यात येणार आहे..
विवा कॉलेज विरार येथे दुपारी 4 वाजता संपन्न होणारया या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, महिला संघटक जान्हवी पाटील आदिंनी केले आहे..