महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – निलंगा विधानसभा मतदार संघातील मांजरा नदीवरील धनेगाव बॅरेज परतीच्या पावसामुळे सर्व क्षमतेने भरले आहे. सध्या धनेगाव बंधाऱ्या खालील अंदाजे वीस किलोमीटर नदीपात्र पाण्याअभावी कोरडे पडले असल्यामुळे नदीलगतच्या धनेगाव शिवार धरणा खालचा भाग शिउर, नदीवाडी, हंचनाळ, टाकळी, चिचोंडी, या गावातील नदी
काठच्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे पिके धोक्यात आली त्याचबरोबर जनावरांना व माणसांना पाण्याविना भटकण्याची वेळ आल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी धनेगाव बॅरेज मधील पाणी नदीपात्रात सोडावे व शेतकऱ्यांचे व जनावरांची पाण्याविना हाल दूर करावे. यासाठी शिष्टमंडळ माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन
पाणी नदीपात्रात सोडण्याची विनंती केली आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लातूर व व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला व परिस्थितीचे गांभीर्य संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ धनेगाव बॅरेज मधील पाणी नदीपात्रात सोडावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी
लातूर यांच्या आदेशान्वये कार्यकारी अभियंता यांनी एक एम एम पाणी नदीपात्रात सोडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी सोडलेल्या नदीपात्रातील पाण्यात जाऊन आनंद व्यक्त केला व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील
नदीवाडीकर, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, मधुकर थोटे, सुग्रीव गंपले, अंकुश बिराजदार तुकाराम बैनगिरे, किशन बोरुळे, संजय पाटील, मिलन बिराजदार, चंदू पाटील, धनराज बिराजदार, आदीं उपस्थित होते.