महाराष्ट्र खाकी ( औसा / प्रशांत साळुंके) – औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना, किल्लारी व कासारसिरसी याठिकाणी बस स्थानक उभारणीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकरजी रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या तिन्ही बसस्थानकांना मंजूरी देत लामजना बसस्थानक पुनर्बांधणी कामाला प्रशासकीय मंजुरी दिली
होती.याच बसस्थानकाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून या कामाचा आढावा दि. 12 एप्रिल रोजी आ. अभिमन्यू पवार यांनी घेतला.सदरील बस स्थानकाचे लोकार्पण मे च्या पहिल्या आठवड्यात करण्याचा मानस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रवासासाठी विविध अडचणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले प्रवाशांना थांबण्यासाठी निवारा नाही हे लक्षात
आल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा केला. या अनुषंगाने 3 जून 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी आ. अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परिवहनमंत्र्यांनी औसा, लामजना व कासार सिरसी या बसस्थानकांना मंजुरी देत. लामजना बसस्थानकाला 1
कोटी 56 कोटी निधीचा समावेश आहे. त्यानुसार 22 जून ला लामजना बसस्थानक पुनर्बांधणी कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. लामजना बसस्थानकाचे काम .या बस स्थानक काम आता अंतिम टप्प्यात असून ३० एप्रिलपर्यंत उर्वरित काम पूर्ण होऊन मेच्या पहिल्या आठवड्यात या बसस्थानकाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे. औसा
आणि लामजना ही दोन्ही बसस्थानके लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.ज्या गतीनं मंजुरीची प्रक्रिया पार पडली होती त्याच गतीनं प्रत्यक्षात काम सुद्धा झाले आहे. कोरोना संकटकाळात अनेक कामांना स्थगिती मिळत असताना योग्य जागी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत बसस्थानकांचे काम थांबणार नाही याची काळजी आ. अभिमन्यू पवार यांनी घेतली.
परिवहनमंत्री व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत मे च्या पहिल्या आठवड्यात लोकार्पणचा मानस – परिवहनमंत्री अनिल परब व लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांची वेळ घेवून मे च्या पहिल्या आठवड्यात लामजना बसस्थानकाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.तसेच औसा आणि लामजना ही दोन्ही बसस्थानके लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. कासार सिरसी बसस्थानकाचे काम सुद्धा फेरनिविदा प्रक्रिया राबवून लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.