कार्यकर्त्यांचा पक्ष असलेल्या भाजपचा मी कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान आहे! – आमदार अभिमन्यू पवार

महाराष्ट्र खाकी (नवी दिल्ली) – आज भारतीय जनता पक्षाचा 42 वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने भाजप च्या नवी दिल्लीतील मुख्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार,आ. डॉ.रामदासजी आंबटकर, आ.आकाशजी फुंडकर, आ. प्रतापजी अडसड व

गिरीशजी गोखले या सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डाजी यांचे मार्गदर्शन देशभरातील कार्यकर्त्यांनी अईकले . भाजप नावाच्या वटवृक्षाचे बीजारोपण करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांना यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी अभिवादनही केले.

पक्षाचा वॉर्ड प्रमुख म्हणून काम करतानाचे दिवस, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष, भाजप शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतानाचे दिवस, जनहितासाठी केलेली कैक आंदोलने आणि संघर्षाचे दिवस राहून राहून आठवत होते. असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी वेक्त केले आहे.

Recent Posts