महाराष्ट्र खाकी (निलंगा ) प्रशांत साळुंके – सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी सोमवारी दि.21 मार्च 2022 रोजी मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात मराठवाड्यासह निलंगा तालुक्यातील ग्रंथालय पदाधिकारी-ग्रंथपाल-कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे लातूर जिल्हा ग्रंथालयाचे सदस्य गुप्तलिंग स्वामी यांनी केले आहे.
सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याच्या उद्देशाने प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याच्या उद्देशाने आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच,ग्रंथालय चळवळीत निलंगा तालुक्याचे योगदान कायम अग्रेसर राहीले आहे.त्यामुळे यावेळीही पदाधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सदस्य गुप्तलिंग स्वामी यांनी सांगितले.
एकंदर,ग्रंथालय पदाधिकारी-कर्मचारी-ग्रंथपाल यासह ग्रंथालय चळवळीशी संबंधित सर्व मान्यवर या धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या निर्णयानुसार सकाळी नऊ ते सायं.चार या वेळेत सहभागी होणार आहेत.