पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील 51 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे,त्यापैकी एक असलेले लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचा आज वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे अभिनंदन केले.

पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी पाेलीस दलात दक्षपणे आपले कर्तव्य बजावणारे पोलिस अधिकारी आहेत यांना साहित्याचीही आवड आहे. त्यांची पाेलीस दलात 28 वर्षे सेवा झाली आहे. त्यांना आजपर्यंतच्या सेवेबद्दल अंतरिक सुरक्षापदक, विशेष सेवापदक , पाेलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पुरस्कार मिळाले आहे.

गजानन भातलवंडे यांनी 28 वर्षांच्या सेवाकाळात अनेक संवेदनशील गुन्ह्यांची उकल केली आहे. शिवाय गुन्ह्यांचा तपास, आरोप सिद्ध करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जवळपास 53 प्रशंसापत्र आणि 410 अवाॅर्ड मिळाले आहेत. 1993 मध्ये ते पाेलीस उपनिरीक्षक म्हणून पाेलीस सेवेत दाखल झाले होते . यापूर्वी विदर्भातील भंडारा, गाेदिया जिल्ह्यांत काम केले आहे, तर मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी आणि बाभळगाव येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रातही सेवा बजावली आहे.

 

Recent Posts