महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोनाचे सावट आणखीन संपले नाही. शासनाने कठोर नियम लागू केले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी एकत्र येऊनये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लातूर जिल्ह्यात थर्टीफस्ट व कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन लातूर जिल्हा पोलीसांनी जिल्हाभरात कडक बंदोबस्त लावला अाहे. कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनानेही कडक निर्बंध लावले अाहेत.
आज पार्टी , विवीध कार्यक्रमास जवळपास बंदी घातली अाहे.पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली अाहे, असे असले तरी जिल्हाभरातील हाॅटेल-धाबे, बार, परमीट रूम ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज अाहेत .
खास करून लातूर शहरातील बार आणि धाबे चालकांचे पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे कारण जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन काही बार चालक आणि धाबे चालक पाळणार नाहीत असे त्यांच्या तयारीवरून दिसते आहे. शेटर बंद करून आत लोकांना सर्व्हिस चालू असते. असे चित्र मागील थर्टिफास्टला दिसून आले होते. दारू पिऊन वाहन चालविणार्या विरूध्द पोलीस ड्रिंक & ड्राईव्ह चे गुन्हे दाखल करण्यासाठी तयार अाहेत.