महाराष्ट्र खाकी ( लातूर) – लातूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या समस्या बाबत प्रखरपणे आपले मत वेक्त करणाऱ्या तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार सामान्य जनमाणसात रुजवण्याचे काम सातत्याने करणाऱ्या भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेश सचिव तथा मॉडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या समस्या सोडवून न्याय देण्याचे काम करत आहेत. याचाच प्रत्येय आज दिसून आला लातूर शहरातील शासकीय कॉलनी भागात असणाऱ्या जिल्हा परिषद
शाळेच्या समस्यांबाबत परिसरातील महिलांनी प्रेरणा होनराव यांच्याशी संपर्क केला होता. याचीच दखल घेत जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रेरणा होनराव यांनी भेट दिली आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, महिला बालकल्याण सभापती राठोड मॅडम , जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारती सोळुंखे मॅडम या काही कार्यक्रमानिमित्त उपस्थित असता प्रेरणा होनराव यांची भेट झाली. या वेळी महिलांनी समस्या त्यांच्या समक्ष उपस्थित केल्या.
विद्यार्थ्यांना या शाळेतील शिक्षण व्यवस्था अधिक सुखकर व्हावी आणि पालकांचे व शिक्षकांचे प्रश्न मिटावे या दृष्टीने विशेषत्वाने शासकीय कॉलनीतील या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. महिला भगिनींशी संवाद साधून आनंद झाला असे मत प्रेरणा होनराव यांनी वेक्त केले यावेळी सतीश ठाकुर , रोहिणीताई देशमुख, पालक, शिक्षक,आदी उपस्थित होते.