महाराष्ट्र खाकी (न्यूज नेटवर्क ) – भारताच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं वक्तव्य कंगनाने एका मुलाखतीत केलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.मात्र, या सगळ्यात ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी कंगनाची पाठराखण केल्याचं दिसून आलं.
विशेष म्हणजे विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhaskar) आणि अतुल कुलकर्णी यांनी विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे. कंगनाच्या वक्तव्यामुळे सुरु झालेल्या वादामध्ये स्वरा भास्कर आणि अतुल कुलकर्णी यांनी उडी घेतली आहे असे म्हणावे लागेल !. स्वरा भास्कर ने कंगनाऐवजी तिला पाठिंबा देणाऱ्या विक्रम गोखलेंवर टीकास्त्र डागलं आहे. स्वराने एक ट्विट करत विक्रम गोखलेंना सुनावलं आहे.
स्वराने आणि चं एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये विक्रम गोखले प्रसारमाध्यमांसमोर बसल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने “पद्म पुरस्कार येत आहे” अशी प्रतिक्रिया दिली. तर तिकडे अतुल कुलकर्णी यांनी विक्रम गोखले यांचे नाव न घेता सुनावले आहे! ” वय आणि शहाणपण या दोन भिन्न गोष्टी आहेत “, असं ट्विट अतुल कुलकर्णीने केलं आहे. अतुलने त्याच्या ट्विटमध्ये विक्रम गोखलेंना उल्लेख केला नसला तरी अप्रत्यक्षपणे त्याने टोला मारल्याचं म्हटलं जात आहे.