महाराष्ट्र खाकी (लातूर) – राज्य सरकार विद्यार्थी,S.T.कर्मचारी,शाळा,महाविद्यालय ,
आरोग्य व्यवस्था, शेतकरी कोणाकोणाकडे लक्ष न देतां माफियांच्या पाठी उभ रहाणारं महाविकास आघाडी सरकार आहे अस मत भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट आणि लातूर भाजपच्या अभ्यासू आणि आक्रमक नेत्या प्रेरणा होनराव यांनी वेक्त केले आहे. प्रेरणा होनराव यांनी या अगोदर पण वेळीवेळी सरकारच्या निराशाजानक कारभारावर अभ्यासपूर्ण मत मांडल आहे. या वेळेस हि त्यांनी आपल्या भावना वेक्त केल्या आहेत.
राज्यात बरेच समस्या आहेत आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्याचे होणारे नुकसान आणि होणारा त्रास, S. T कर्मचाऱ्याचे प्रश्न, शेकऱ्यांचे नुकसान या गोष्टींकडे लक्ष न देता एका कर्तव्यनिस्ट अधिकाऱ्यावर आणि त्याच्या परिवारावर आरोप करून वेळ वाया घालवत आहेत. त्याच्या खासगी आयुष्य सार्वजनिक केले जत आहे. त्याच्या पत्नी बद्दल बोलले जत आहे. सरकारच्या अशा वागण्याचा संताप होत आहे असे प्रेरणा होनराव यांनी म्हंटले आहे.