महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूरची पहिली ओळख म्हणजे शिक्षणात लातूर पॅटर्न म्हणून आहे. याच लातूर पॅटर्नच्या यशात लातूरचे माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी भर टाकली आहे. भारताच्या 16 व्या लोकसभेत खासदार राहिलेले उच्च शिक्षित “हायरेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये उच्च शिक्षित लोकप्रतीनिधी अशी नोंद असलेले , लोकप्रिय संसदरत्न माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड हे आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या “आंतरराष्ट्रीय योगशिक्षक आणि परीक्षक ” परीक्षेत Level 3 (Yoga Teacher and evaluator ) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. डॉ सुनील गायकवाड यांनी खासदार असताना ही लातूर चे अनेक प्रश्न खासकरून शैक्षणिक विषय लोकसभेत मांडले,सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि औरंगाबादला पाली विद्यापीठ ची ही मागणी लोकसभेत केली होती.11 वी च्या वर्गात 10 वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरळ प्रवेश मिळावा ही मागणी ही लोकसभेत केली होती.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतीच झालेली NEET परीक्षा केंद्र मराठवाड्यात लातूर आणि नांदेड ला त्यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले.
असे शिक्षण क्षेत्रात आवड असलेले डॉ सुनील गायकवाड यांनी आयुष मंत्रालयाची योगा बोर्डची ही अत्यंत अवघड असलेली परीक्षा प्रथम श्रेणीत येऊन पास झाले आहेत. शिक्षण घेण्याची आवड त्यांनी सोडली नाही. खासदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली असली तरी त्यांना आजन्म विद्यार्थी राहायला आवडत असल्याने त्यांनी शिक्षण घेणे सुरूच ठेवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या मित्र परिवाराने आणि लातूरच्या जनतेने विशेषता भारत सरकार चे कायदा मंत्री किरेन रीजू जी,भारत सरकार आयुष मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल केंद्रीय कैबिनेट मंत्री,राज्यमंत्री श्रीपाद नाईक,केंद्रीय माहिती आणि प्रसार तथा खेल मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पेट्रोलियम गॅस, कामदार राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाईजर राज्यमंत्री भगवंत खुब्बा,केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे आदी मित्रांनी फोन करून शुभेच्छा दिल्या .