लातूरचे अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांची बदली,अनुराग जैन नवे अपर पोलीस अधीक्षक

महाराष्ट्र खाकी (लातूर) – राज्यातील 31 IPS अधिकाऱ्यांसह 54 पोलीस उपायुक्त / अपर अधीक्षक यांच्या सह 92 साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 6 सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत . लातूर जिल्ह्यात आपल्या उत्कृष्ठ कार्यशैलींने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची व पोलीस खात्याअंतर्गत सर्वांची मने जिंकणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांची सोलापूर ग्रामीण पोलीस येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे .

त्यांच्या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नियुक्ती झाली आहे. हिम्मत जाधव यांनी लातूर जिल्ह्यात आल्यापासून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या विशिष्ठ आणि उत्कृष्ठ कार्यशैलीने सर्वसामान्य नागरिकांची व पोलीस खात्याअंतर्गत सर्वांची मने जिंकत आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. त्यांनी डॉ. राजेंद्र माने, निखिल पिंगळे यांच्याबरोबर काम केले. हिम्मत जाधव यांनी पोलीस प्रशासनाचा जिल्ह्यात चांगला वचक बसविला होता. लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मुख्यालय यांच्यामध्ये उत्कृष्ट समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले. कोठेही वादाचे मुद्दे उपस्थित होणार नाहीत याची काळजी घेत संवेदनशील व अतिसंवेदनशील प्रकरणे हाताळली. गुन्हेगारांना वचक राहील यासाठी विविध उपाय योजले.अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांमध्ये त्यांचा तपास उल्लेखनीय ठरला.

करोना प्रदुर्भावाच्या काळात नागरी हित सांभाळत नियमांचे पालन करण्यात त्यांचे प्राधान्य राहिले. करोना बाधित झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या उपचारावर त्यांनी विशेष लक्ष दिले. करोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यात शांतता राखण्यात, कायद्याची अंमलबजावणी करण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. वेगळ्या पद्धतीने गुन्ह्यांची उकल करण्याची त्यांची ख्याती होती . अनेक प्रकरणांमध्ये व तपास करण्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. वरिष्ठ पोलीस अधिकारी असूनही एक संवेदनशील व कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या कामाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.त्यांच्या जागी आलेल्या अनुराग जैन यांच्याकडूनही लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Recent Posts