महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार विक्रांत गोजमगुंडे यांच्याकडे आल्या पासून शहरात वेगवेगळे प्रयोग आणि प्रकल्प राबून शहराला एक आदर्श शहर बनवत आहेत. विक्रांत गोजमगुंडे यांच्या याच कार्याची दाखल घेत देशातील अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील महापौरांमधून लातूरचे प्रथम नागरिक विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली आहे.आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल देशपातळीवर घेतली गेली. हा मान विक्रांत गोजमगुंडे यांच्या मुळे लातूर मनपाला आणि लातूरला मिळाला आहे खऱ्या अर्थाने हा प्रत्येक लातूरकराचा सन्मान आहे.तसेच ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे कारण महाराष्ट्रातून फक्त लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली आहे. प्रजातंत्र 2021 या अनोख्या महोत्सवा अंतर्गत आयोजित कार्यक्रमात देशातील 3 सर्वोत्कृष्ट महापौर हे मॉडेल सिटी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचाही यात समावेश असून त्यांच्यासमवेत श्रीनगरचे जुनैद अजीम मत्तू आणि दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांचेही मार्गदर्शन होणार आहे. प्रजातंत्र 2021 हा लोकशाही मधील एक अनोखा व्हर्च्युअल उत्सव आहे. या अंतर्गत आयोजित उपक्रमात देशातील 21 राज्य आणि 30 शहरांसह 67 विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे.
मॉडेल सिटी व्यवस्थापन हा विषय घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आयोजित स्पर्धेतून निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना तीनही महापौर मार्गदर्शन करणारा आहेत. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी शहर व्यवस्थापनात केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. विविध फेऱ्यांनंतर आता दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11.45 या कालावधीत या तीनही महापौरांचे मॉडेल शहर व्यवस्थापनाबाबत असणारे विचार विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहेत. झूम अँपच्या माध्यमातून यात सहभागी होता येणार आहे. या उपक्रमाच्या अंतिम फेरीत लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची मार्गदर्शन करण्यासाठी निवड झाली आहे. त्यांचे विचार,आजवर केलेले काम,राबवलेल्या योजना यासंबंधी विचार देशभरातील विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहेत. त्यांच्यासमवेत श्रीनगरचे जुनैद अजीम मत्तू आणि दक्षिणी दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.