कोल्हापूर जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवांवरील वाहनांकरिता इंधन पुरवण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलंडे यांचे निर्देश

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – जिल्ह्यामध्ये दि. 15 मे रात्री 12 ते 23 मे 2021 रोजी रात्री 12 वा. पर्यंत आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये पेट्रोल/डिझेल इंधनाचा पुरवठा उपरोक्त आदेशामध्ये सुट दिलेल्या अत्यावश्यक सेवांवरील वाहनांकरिता सुरळीतपणे होणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांसाठी अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलंडे यांनी निर्देश जारी केले आहेत.
सर्व पेट्रोल पंपचालकांनी जिल्हाधिकारी यांच्या संदर्भीय नमूद आदेशामध्ये नमूद सुट दिलेल्या केवळ आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्री करावी.
सर्व पेट्रोल पंपचालकांनी ज्या वाहनांना पेट्रोल/डिझेल दिले जाणार आहे त्या अत्यावश्यक सेवेचा प्रकार मालकाचा किंवा वाहनचालकाचा तपशिल, दिलेल्या इंधनाचे परिमाण इत्यादी नोंदी ठेवल्या पाहिजेत.
सर्व पेट्रोल पंपचालकांनी आपला इंधन क्षमतेच्या 50 टक्के कोटा राखीव म्हणून शिल्लक ठेवावा. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निकडीच्या वेळी आवश्यकतेनुसार सदर कोटयामधून इंधनाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येतील.
वरील सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे तरतुदीनुसार तसेच भारतीय दंडसंहिता 1860(45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेण्यात यावी.

Recent Posts