लातूर जिल्हा

वीज वापरात स्वयंपूर्ण होणारी लातूर महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील स्ट्रीट लाईट, स्थानिक कुपनलिकावरील पाणीपुरवठा तसेच मांजरा धरणातून करण्यात येणारा पाणी उपसा यासाठी लातूर महापालिकेला मोठ्या प्रमाणात वीज लागते यासाठी महापालिका महावितरणकडे दर महिन्याला कोट्यावधी रुपयांचे वीज बिल भरणा करते . उत्पादनाची साधने कमी असल्यामुळे महापालिकेला सदरील वीज बिल भरण्यात अनेकवेळा अडचणी येतात. काहीवेळा तर बिल भरणा झाला नाही म्हणून महावितरणकडून
वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रसंगी उद्भवतात. सदरील अडचण कायमची दूर करण्यासाठी महापालिकेने विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे अशी संकल्पना मांडून त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले होते. या निर्देशानुसार महापौर विक्रांत गोजमगुंडे इतर पदाधिकारी तसेच तत्कालिन आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी पालक मंत्री ना. देशमुख यांच्याकडे केली होती. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचा बरेच दिवस शोध घेण्यात येत होता. पालकमंत्री ना देशमुख यांच्या उपस्थितीत महापालिका पदाधिकारी, अधिकारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात या संदर्भाने अनेक वेळा चर्चा झाल्यानंतर रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथील 7 हेक्टर 80 आर जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली. नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज तसेच मनपा आयुक्त आमन मित्तल यांनी या कामाला गती देऊन आता जमीन हस्तांतरण प्रक्रिया पार पाडली आहे. यासाठी महापालिकेने 1 कोटी 36 लाख 50,000 रुपयांचा निधी महसूल विभागाकडे जमा केला आहे. त्यानंतर महसूल विभागाने सदरील जमीन महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे .

पाथरवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या या 5 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पातून दरमहा जवळपास 7 लाख ते 7 लाख 50 हजार युनिट वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे या सौर ऊर्जा प्रकल्पात निर्मित होणारी सदरील वीज पानगाव येथील 33 KV वीज केंद्राला दिली जाणार असून त्या बदल्यात महावितरणकडून लातूर महापालिकेला आवश्यक असणारी वीज मिळणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत महाऊर्जा (मेढा) देखरेख यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

Most Popular

To Top