महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर पॅटर्नने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या लातूर पॅटर्नचे नाव करण्यात अनेक शिक्षण संस्थांचे योगदान आहे.त्यातील एक प्रा. उमाकांत होनराव यांचे रिलाईन्स सायन्स जुनियर कॉलेज (त्रिपुरा विज्ञान महाविद्यालय) या शिक्षण संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले, अनेकांना रोजगार दिला त्यामधील एक विद्यार्थी वाहतूक हा एक रोजगार आहे जो हजारो परिवरांचे रोजगारांचे साधन आहे. पण कोरोनामुळे मागील वर्ष पूर्ण शाळा कॉलेज बंद होते आणि आताही आहेत यामुळे या विद्यार्थी वाहतूक करणारे यांचा रोजगार बंद आहे, आणि सरकार लॉकडाऊन करणार असे दिसून येतय याच भीतीने हे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक संघटना आणि गाडी मालक यांनी महाराष्ट्र भाजपा मीडिया पॅनलिस्ट आणि प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा प्रेरणाताई होनराव यांच्याकडे धाव घेतली. प्रेरणाताई होनराव यांनी या सर्वांच्या बाजूने सरकार आणि लातूर प्रशासनाला कडक भाषेत इशारा दिला. प्रेरणाताई बोलताना म्हणाल्याकी सरकारने महाराष्ट्रात शाळा कॉलेज बंद करून या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षण मंत्री यांच्याकडे कोणतेचे नियोजन नसल्याने हा गोधळ उडाला आहे आणि या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांचा रोजगाराचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा आणि यांना उपाशी मरण्यापासून वाचवावे, नाहीत या लोकांसोबत आंदोलनाचा इशारा दिला.अशा कडक भाषेत सरकारला आणि लातूर प्रशासनाला सांगितले आहे.
प्रेरणाताई होनराव यांचा प्रशासकीय आणि राजकीय अभ्यास प्रघड असल्याचे आणखीन एकदा सिद्ध झाले कारण, प्रेरणाताई बोलताना सरकार शिक्षण मंत्री यांच्या कारभारा मुळे राज्यातील शाळा कॉलेज बंद आहेत आणि फिस वसुली चालू आहे. आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेले सर्व रोजगारही बंद आहेत. इतर राज्यातील शाळा कॉलेज चालू आहेत हेही सांगण्यास विसरल्या नाहीत. प्रेरणाताईंनी tv वर राजकीय चर्चेत सहभाग घेऊन भाजपाची बाजू अभ्यासपूर्वक जनतेसमोर मांडली आहे. याच कारणाने विद्यार्थी वाहतूक संघटनेचे लोक यांच्याकडे मदत आणि न्यायासाठी आले आहेत.