LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली गावठी पिस्टलसह आरोपी ताब्यात

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) –  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सातत्याने सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तत्पर कारवाईत विनापरवाना गावठी पिस्टलसह एका संशयितास रंगेहात ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान दिनांक १ एप्रिल रोजी शिरूर अनंतपाळ येथील आरी मोड परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमावर पथकाने लक्ष ठेवले. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या कमरेला खोचलेली गावठी पिस्टल आढळून आली. तत्काळ शस्त्र जप्त करून संबंधित आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या कर्तव्यदक्षतेचे व तात्काळ निर्णयक्षमतेचे उत्तम उदाहरण मानले जात आहे. गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करत असल्यामुळे अशा कारवाया शक्य होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या कारवाईत सहभागी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही समन्वय साधत अचूक माहितीच्या आधारे धाडसी कारवाई केली. या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून अनधिकृत शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

Recent Posts