Shivendr raje लातूर जिल्ह्यातील महत्वाची विकासकामे शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत गतीने पूर्ण करणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – जिल्ह्यात सुरु असलेली जलसंधारणाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे. त्यांनी सर्व प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे. या अंतर्गत 15 एप्रिल 2025 पर्यंत जिल्ह्यातील महत्त्वाची विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

ठेवण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांना जलदगतीने सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणे, हा देखील या उपक्रमाचा भाग असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वज वंदनेचा मुख्य शासकीय समारंभ झाला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानच्या

टप्पा दोनमध्ये 128 गावांमध्ये जलसंधारणाची 143 कोटी 59 लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी 2 हजार 142 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून होत असलेल्या कामांमुळे तलावांच्या साठवण क्षमतेत लाखो लिटरची भर पडली आहे. जिल्ह्यात सुरु असलेली जलसंधारणाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे पालकमंत्री

शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा जलद आणि सोप्या पद्धतीने लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरुपात शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. तसेच जिल्ह्यात जवळपास 1 लाख 38 हजार शेतकऱ्यांना

मुख्यमंत्री वीज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेचीही त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या इतिहासात लातूर जिल्ह्याचे विशेष महत्व आहे. विविध क्षेत्रात नाव लौकिक असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याचा मनस्वी आनंद

आहे. सामाजिक सलोखा, वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमंती ही जिल्ह्याची ओळख आहे. आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी सर्वजण एकत्र येवून करूया, असे आवाहनही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केले.

Recent Posts