महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूरकरांनो चुकीच्या खोट्या माहिती असलेल्या पोस्ट कृपया फॉरवर्ड करू नका. झाडांच्या नावावर असलेली दुकानदारी बंद करा.. असे आवाहन प्रखर पर्यावरणवादी सुपर्ण जगताप यांनी लातूरच्या नागरिकांना केले आहे. सुपर्ण जगताप यांनी आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी 1993 –
1994 ला लातूर शहरात वृक्ष चळवळ सुरु केली, या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक संस्थाना सोबत घेऊन लातूर शहरात वृक्ष लागवड आणी संगोपन केले त्यांचे हे कार्य वाढत गेले सुपर्ण जगताप यांच्या या चालवळीची दाखल महाराष्ट्रातील अनेक शहर, जिल्हा आणी गावातील संस्था आणी पर्यावरणवादीनीं घेऊन
त्यांच्या भागात चालू केली, सुपर्ण जगताप सध्या दुर्मिळ वनस्पती संवर्धन निसर्ग शाळा व देवराई निर्मिती या उपक्रमावर कार्य करत आहेत, या सर्व काळात सुपर्ण जगताप यांनी आणी त्यांच्या सहकार्यानीं कधीच त्यांच्या कार्याचे मार्केटिंग आणी प्रसिद्धी केली नाही कि करू दिली नाही, पण अलीकडच्या काळात लातूर शहरात वृक्ष
चळवळीच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षाचा व्यापार, मार्केटिंग, प्रसिद्धी आणी दुसऱ्यांच्या कार्याचे श्रेय लाटणाऱ्या बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट करून लातूर शहरातील चळवळ कशी सुरु झाली याचा थोडक्यात प्रवास सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पर्यावरणवादी सुपर्ण जगताप यांनी आपल्या पोस्ट मध्ये
” लातूरकरांनो चुकीच्या खोट्या माहिती असलेल्या पोस्ट कृपया फॉरवर्ड करू नका. झाडांच्या नावावर असलेली दुकानदारी बंद करा.. लातूरमध्ये सर्वात प्रथम 1993/94 मध्ये दिलीपराव देशमुख जि.प. अध्यक्ष असताना त्यांच्या पुढाकाराने शहरा मध्ये हजारो पिंपळ, आकाशमोगरा ही झाडे लावली गेली, नंतर औसा रोडवर नगरपरिषदेने
तेलाच्या डब्यात तयार केलेली मोठी झाडे आणून एस आर देशमुख यांच्या काळात लावली. आजही ही झाडे डौलाने उभी आहेत. 2011 मध्ये 52 पेक्षा जास्त संस्था एकत्र येऊन सामुहिक चळवळ उभी केली. महाराष्ट्र सरकारने या गोष्टीची दखल पण घेतली. कॅरीबॅग बंदी व वृक्षसंवर्धन हे दोन विषय हाताळले गेले. त्या काळात अँड सचिन काळे,
डॉ. शिवाजी भिसे, प्रा विद्याधर कांदे पाटील, हेमलता वैद्य, शेख शफी, शिवाजी कांबळे, अतुल ठोंबरे, शिरीष कुलकर्णी, सचिन मालु, नितिन शेटे, मिलिंद बिलोलीकर यांनी जबाबदारी घेऊन कार्य केले. ख-या अर्थाने सर्व लातूरकरांनी एकत्र चळवळीची सुरुवात केली. 2015 ला पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पुन्हा शहरातील सर्व संस्था
एकत्रितपणे उभ्या राहिल्या. लातूर वृक्ष चळवळ हे नाव ठरवले. 2015/16 मध्ये मुख्य रस्त्यावर पॉलिटेक्निकल च्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मार्क आउट देण्यात आले यावेळी मनपाचे इंजिनियर उपस्थित होते. मग शहरात सर्वत्र पंधरा हजार खड्डे घेण्यात आले, नंतर मुख्य रस्त्यावर व रिंग रोडवर प्रशासनाच्या मदतीने 15 हजार झाडे
लावली. 2019 पर्यंत पाणी देऊन जगवली. आज आम्ही बोलत नाही याचा अर्थ हे कार्य कोणा एका संस्थेने किंवा एका माणसाने केले असे होत नाही. मुख्य प्रश्न आहे ही श्रेय वादाची दुकानदारी कशासाठी ? आमच्या कित्येक पिढ्या आमचे वास्तव्य गावभागातील तरी आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य उभे केले. यामध्ये सगळ्या
पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी लातूरकरांचा 52 संस्थांचा सहभाग आहे. विक्रांत गोजमगुंडे स्थायी सभापती असताना 2017 मध्ये शहराच्या वृक्ष नियमावलीला मान्यता देण्यात आली आणि अशोक गोविंदपुरकर सभापती असताना डीव्हायडर मधील झाडे लातूर मधील विविध फर्म ,संस्थेच्या मदतीने लावण्यात आली . मुळात
आपण शेतीशी संलग्न असलो की आपल्याला या सगळ्या परिसंस्था कळतात कारण शेतकऱ्याचे मातीशी असलेले नाते हे त्याला कायम निसर्ग ज्ञान देत असते. म्हणून गवत कशाला म्हणायचे फुलांची छोटी झुडपे कोणती. आणि वृक्ष कशाला म्हणायचं हे आधी समजून घ्यायला हवं. महाराष्ट्रातून अनेक मित्रांचे फोन येतात कोल्हापूर
पुण्यामध्ये लाखो झाडे नाहीत लातूर मध्ये कशी ? असे चुकीचे पोस्ट कृपया फॉरवर्ड करू नये. कुठलीही चळवळ ठराविक लोकांची, एका संस्थेची मक्तेदारी होऊ शकत नाही किंबहुना माझीही नाही.त्यामध्ये त्या शहरातील सगळ्या संवेदनशील निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमी नागरिकांचा,संस्थांचा सहभाग असतो. आज रोजी
लातूरमध्ये 13 ते 14 हजार झाडे आहेत. यांचे आॅडीट एका संस्थेमार्फत, विद्यापीठ उपकेंद्र, लातूर शहर मनपा करत आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला झाड कशाला म्हणायचे हे माहीत करून घ्यायला हवे. दिड लाख झाडे, अहो अक्षरशः महाराष्ट्रातील लोक हसतात. आपण चळवळीच्या माध्यमातून झाडे लावली पण मुख्य रस्त्यावर 3/4 हजार
झाडे आहेत मग लाख कशासाठी ? तुम्हाला झाडा़चा, पाण्याचा व्यवसाय करायचा करा पण चुकीच्या झाडांची संख्या सांगू नका, थोडं लाजा या पृथ्वीवर आपण कायम वास्तव्यास नाही . आपण प्रवासी म्हणून या ग्रहावर आलो आहोत. कर्म असे करा की पृथ्वीवरून निघताना पण स्वतःचा सन्मान वाटला पाहिजे. जर शेतकऱ्यांनी
सोयाबीन, तुरीच्या, ज्वारीच्या धाटाची संख्या मोजायला चालू केली तर करोडो अरबो, अरबो होतील. गवत , फुलाचे हे झुडूप असते झाड नाही. झाड कशाला म्हणायचं आधी समज करून घ्या. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे किमान जे झाड आम्हाला जगवतो आणि कधीही म्हणत नाही की मी तुम्हाला जगवतो. या पृथ्वीवर झाड, वनस्पती सर्वात आधी आली आहेत आणि त्यांनी माणसाची निर्मिती केली आहे म्हणून आपण झाडाच्या ऋणात राहू….” असे लिहिले आहे.