महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी सार्वजिनक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव डॉ.अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. डॉ.अनिलकुमार
गायकवाड यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. डॉ.अनिलकुमार गायकवाड यांचे या निवडीवरून त्यांचे बंधू आणि लातूरचे मा. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी विशेष अभिनंदन आणि कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकार मधे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिव पदी उत्तम कामगिरी केलेले आणि
दिल्ली चे महाराष्ट्र सदन, मुंबई सी लिंक,मुंबई तील सर्व उड्डाणपुले, मुंबई पुणे एक्सप्रेस वे,समृद्धी महामार्ग,आणि महाराष्ट्रातील सर्व हायवे निर्माण मधे तांत्रिक प्रमुख म्हणून ज्यांनी काम केले त्या उत्कृष्ट अभियंता असा दोन वेळा महाराष्ट्र शासनानी ज्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला ते माझे मोठे बंधू परमपूज्यनीय
आण्णा डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची एमएसआरडीसी च्या व्यवस्थापकीय संचालक पदी निवड ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. पूज्यनीय आण्णा च्या या निवडीमुळे त्यांच्या कल्पनेतील नागपूर गोवा आणि मुंबई – जाहिराबाद असे नवीन दोन एक्सप्रेस वे आता लातूरवरुण जातील आणि ते काम ही
समृद्धी महामार्ग सारखे आण्णा पूर्ण करतील हा आत्मविस्वास मला आहे. पूज्यनीय अण्णा आपणाला कोटी कोटी शुभेच्छा आणि कोटी कोटी अभिनंदन… तुमचा बंधू प्रो. डॉ. सुनील बळीराम गायकवाड मा.खासदार लातूर लोकसभा.