महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील तावरजा कॉलनीमधील इस्लामपुरा भागीत अलनासिर मजिद जवळ फुगे विकणार्या व्यक्ती जवळील नायट्रोजन गॅस सिलेंडर फुटल्याची दुर्देवी घटना घडली या घटनेची माहिती मिळताच लातूरचे मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या स्फ़ोटात गंभीर दुखापत
झालेल्या 11 बालकांच्या पालकांची आणि पारिजनांची विलासरावजी देशमुख शासकीय महविद्यालय येथे भेट घेवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि आवश्यक ते सर्व उपचार योग्यरीतीने केले जातील याबाबत आश्र्वस्त केले. आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय तज्ञांना आवश्यक उपचार
करण्याची विनंती केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून सर्व लातूरकरांनी आपल्या बालकांना यापुढे गॅसचा फुगा घेऊन देण्यापूर्वी गांभीर्याने विचार करावा असे आवाहन केले आणि प्रशासनाने अशा अवैद्य रित्या घातक केमिकलचा वापर करून फुगे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कार्यवाही करावी अशी ही मागणी जिल्हा
प्रशासनाकडे केली. मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घटने बाबत अधिक माहिती घेतली असता हवेत तरंगणारे फुगे विक्री करणाऱ्या व्यक्तीने गॅस टाकीमध्ये कार्बाईट चे खडे टाकण्यास सुरुवात केली आणि त्याचे प्रमाण जास्त झाल्याने स्फोट घडून आला. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूला थांबलेली लहान मुले दूरवर फेकली गेली,
अनेकांचे शरीर भाजले गेले. असे फुगे विक्रेते गॅस, कार्बाईट, हेलियम, हायड्रोजन तत्सम पदार्थ अवैधरीत्या वापरतात यावर बंदी येणे आवश्यक आहे असे विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी प्रशासनाकडे मागणी केली आणि सर्व लातूरकरांनी आपल्या मुलांना यापुढे गॅसचा फुगा घेऊन देण्यापूर्वी गांभीर्याने विचार करावा असे आवाहन
मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी केले . प्रशासनानेही अशा अवैद्यरित्या घातक रसायनांचा वापर करून फुगे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली.