महाराष्ट्र

महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या 27 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेचे 24 सप्टेबर रोजी आयोजन

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – मराठवाड्यातील बँकींग क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करून नावलौकिक मिळविलेल्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची 27 वी वार्षीक सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबर 2023 रोजी रविवारी सकाळी 11 वा.जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्‍या स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक सभागृह

एमआयडीसी, लातूर येथे होणार आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची गेल्या सव्वीस वर्षापासून यशस्वी वाटचाल सुरू आहे. हे बँकेच्या कार्यावरून समोर आलेले आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेला राष्ट्रीयस्तरावरील अनेक पारितोषिके मिळालेली आहे. या बँकेची 27 वी वार्षीक सर्वसाधारण

सभा 24 सप्टेबर 2023 रोजी होणार आहे. या वार्षीक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी एमएनएस बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 24 सप्टेबर

रोजी होणार्‍या या एमएनएस बँकेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी केलेले आहे.

Most Popular

To Top